स्वंयसेवकांवर इतकाच विश्वास असेल तर सरकारी खर्चावर कमांडो सुरक्षा का ?-मायावती

टीम महाराष्ट्र देशा: भारतीय लष्कराला सध्या विविध प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. भागवतांचे वक्तव्य हे जवानांचे मानसिक खच्चीकरण करण्यासारखे आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करण्याची त्यांना परवानगी दिली जाऊ शकत नाही, मोहन भागवत यांना आपल्या स्वंयसेवकांवर इतका विश्वास असेल तर सरकारी खर्चावर त्यांनी विशेष कमांडो आपल्या सुरक्षेसाठी का ठेवले आहेत असा सवाल बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना केला आहे.

काय म्हणाले होते मोहन भागवत ?

सैन्याला तयारीसाठी ६-७ महिने लागतील मात्र, आपण दोन दिवसांतच तयार होऊ शकतो, कारण आमची शिस्तच तशी आहे. देशाला जर आमची गरज पडल्यास तसेच संविधानाने आणि कायद्याने आम्हाला परवानगी दिली. तर आम्ही तात्काळ शत्रूशी लढण्यास तयार आहोत.