मी भाजपाची रात्रीची झोप उडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- मायावती

टीम महाराष्ट्र देशा- मी भाजपाची रात्रीची झोप उडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निश्चय बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केला आहे. शुक्रवारी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाने मोर्चेबांधणी केल्यामुळे मायावतीच्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला या पार्श्वभूमीवर मायावती यांनी भाजपवर हल्ला चढवला.

काय म्हणाल्या मायावती ?

राज्यसभा निवडणुकीत माझ्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करुन माझ्यामध्ये आणि समाजवादी पार्टीमध्ये भांडण लावून देण्याचा भाजपाचा उद्देश होता. पण मी कुठल्याही परिस्थितीत भाजपाचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही मायावती गरम डोक्याची आहे, ती लगेच समाजवादी पार्टीबरोबर आघाडी मोडण्याचा निर्णय घेईल असे भाजपाला वाटत आहे. पण मी कुठल्याही परिस्थितीत भाजापाला यशस्वी होऊ देणार नाही तसेच मी भाजपाची रात्रीची झोप उडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

राज्यसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विरोधी पक्षांवर निशाणा साधला. सपाची अतिरिक्त मते बसपाच्या उमेदवाराला गेली नाहीत. बसपासाठी हा एक मोठा धडा होऊ शकतो. सपाचा स्वार्थी चेहरा लोकांनी पाहिला आहे. समाजवादी पक्ष घेऊ शकतो, देऊ शकत नाही. समजदार ठोकर से समझते है, असे म्हणत टोला लगावला.दरम्यान भाजपाच्या बाजूने मतदान करणारे आमदार अनिल कुमार सिंह यांना मायावतींनी आज पक्षातून निलंबित केले आहे .