मयंक वैद: ‘एंडुरोमॅन ट्रायथलॉन’ स्पर्धा पूर्ण करणारा प्रथम भारतीय

टीम महाराष्ट्र देशा : जगातली सर्वाधिक खडतर अशी ‘एंडुरोमॅन ट्रायथलॉन’ स्पर्धा पूर्ण करून मयंक वैदने नवा विश्वविक्रम केला आहे. 42 वर्षांचा मयंक वैद ही स्पर्धा पूर्ण करणारा पहिला भारतीय तसेच पहिला आशियाई खेळाडू ठरला. ही स्पर्धा पूर्ण करणारी ती जगातली 44 वी व्यक्ती आहे.

ही स्पर्धा 50 तास 24 मिनिटांत पूर्ण करून त्याने नवा विक्रम केला. आधीचा विक्रम बेल्जिअमच्या ज्युलिअन डेनेअर ह्याच्या नावावर 52 तास 30 मिनिटांचा होता.मयंक वैदचा जन्म विलासपूरचा आहे आणि सध्या ते हाँगकाँगचा निवासी आहे. व्यवसायाने वकील असलेले मयंक वैद एका कंपनीत इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी डायरेक्टर आहे.

दरम्यान ट्रायथलॉन हा एक वेगवेगळा क्रिडाप्रकार आहे, ज्यात प्रामुख्याने धावणे, पोहणे आणि सायकलिंग असते. ‘एंडुरोमॅन ट्रायथलॉन’ स्पर्धेसाठी लंडनपासून फ्रान्सपर्यंतचे अंतर पार करावयाचे असते. 140 किलोमीटर धावणे, 33.8 किलोमीटर समुद्रातून पोहून जाणे आणि 289.7 किलोमीटर अंतर सायकलिंग करणे हे भाग या स्पर्धेत आहेत.