“परीच्या आगमनाने आनंद गगनात मावेना”

virushka

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी नव्या पाहुण्याच आगमन झालं आहे. विराटने सोशल मीडियामार्फत सर्वांना ही गोड बातमी सांगितली आहे. ‘आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की, आज दुपारी आम्हाला मुलगी झाली. आम्ही आपल्या प्रेमाबद्दल मनापासून आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी दोघीही ठीक आहेत. आमचं सौभाग्य आहे की जीवनाचा हा चॅप्टर आम्हाला अनुभवता आला. आता आम्हाला थोडी प्रायव्हसीची गरज आहे’ असं आवाहन देखील त्याने केलं आहे.

विराट नंतर विराटचा भाऊ याने देखील सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून नव्या पाहूनचं स्वागत केलं आहे. चिमुकलीच्या आगमनाने विराट आणि अनुष्काचा परिवार देखील फार खुश आहेत. विराटच्या भावाने चिमुलीच्या पावलांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून आपला आनंद व्यक्त केला आहे.

विराट हा फिटनेस फ्रिक आहे हे सर्व चाहत्यांना माहीतच आहे. विराटच्या या कडक शेड्युलचे अनुष्काने गरोदरपणात देखील पालन केल्याचं अनेकदा समोर आलं होतं. कधी ती योग करतानाचे तर कधी वर्कआउट करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून गरोदरपणातील योग्य शारीरिक काळजीसाठी जागृती देखील करण्याचा प्रयत्न केला होता.

अनुष्काने एका मुलाखती दरम्यान सांगितलं होतं की, ‘विराटने बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही याबाबत खूप विचार केला. आम्ही आमचं बाळ वाढताना लोकांना दाखवण्याची इच्छा नाही. आम्ही आमच्या मुलांना सोशल मीडियात अडकवू इच्छित नाही. पुढे जाऊन त्याचा निर्णय मुलं घेतील. आजकाल मोठ्यांनाच सोशल मीडिया हँडल करण्यात इतकी समस्या येते. हे थोडं कठीण असेल पण आम्ही हे फॉलो करु.’

महत्वाच्या बातम्या