fbpx

मावळचे शिवसेना नेते पार्थ पवारांसोबत !

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे नेतेमंडळीच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू पार्थ पवारांनी मावळ मतदारसंघातून मोर्चेबांधणी करायला सुरवात केली आहे.मावळ परिसरात गाठीभेठी घेताना दिसत आहेत. मात्र निवडणूक उंबरठ्यावर येऊन ठेपली असताना मावळ मतदार संघातील काही शिवसेनेचे नेते पार्थ पवारांसोबत दिसत आहेत.शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे काही दिवसांपूर्वीच म्हणाले होते, कोण पार्थ पवार ? त्याला आता पार्थ पवारांसोबत फोटोसेशन करून मावळच्या शिवसेना नेत्यांनीच उत्तर दिल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे आणि भाजपचे (सलग्न) नगरसेवक नवनाथ जगताप यांनी पार्थ पवारांसोबत फोटोसेशन केल्याने आश्चर्य व्यक्त केली जात आहे.मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा सुरु झाल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेना नेते एकमेकांवर टीका करत आहेत. दरम्यान, याबाबत एका वृत्ववाहिनीने शिवसेनेच्या राहुल कलाटे यांना विचारल असता ते म्हणाले, ‘एका कार्यक्रमादरम्यान पार्थ पवारांची सहज भेट झाली. त्यावेळी फोटो काढल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. आपण निवडणुकीत शिवसेनेचंच काम करणार असल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे.