मावळात पार्थ पवारांना दाखवला कात्रजचा घाट, आ बाळा भेगडेंचा आता मंत्रिमंडळात थाट

maval mla bala bhegde take oth as maharashtra minister

टीम महाराष्ट्र देशा: मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचा पराभव करण्यात मोलाची कामगिरी करणारे आ संजय उर्फ बाळा भेगडे यांना राज्य मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. पवारांना कात्रजचा घाट दाखवल्यानेच भेगडे यांना मंत्रीपद देण्यात आल्याची चर्चा आहे.

बाळा भेगडे हे मावळ विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयी झाले आहेत, पुणे जिल्हा भाजप अध्यक्ष तसेच महाराष्ट्र भाजप सचिव पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. दरम्यान, या पूर्वी पुणे जिल्ह्यातून मंत्री असणारे गिरीश बापट हे लोकसभेत विजयी झाले आहेत तर राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना मंत्रीमंडळातून नारळ देण्यात आला आहे. त्यामुळे बाळा भेगडे हे जिल्ह्यातील एकमेव भाजप मंत्री असणार आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती, शिवसेनेकडून श्रीरंग बारणे यांनी पवार यांना तगडी लढत दिली. मतदानापूर्वी स्थानिक स्तरावर भाजप – शिवसेनेत वाद असल्याचे चित्र निर्माण झाले होते, मात्र वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थीकरत युतीचा विजय सुकर बनवला. त्यामुळे मावळात पार्थ पवार यांचा सव्वा दोन लाखांच्या फरकाने पराभव झाला आहे.