मावळ लोकसभा : वाचा कोणता उमेदवार, कोणता पक्ष?

टीम महाराष्ट्र देशा(प्रवीण डोके) – लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येत तसे तसे प्रत्येक पक्षाच्या हालचालींना वेग आला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून सध्या राष्ट्रवादी, शिवसेना पाठोपाठ भाजपनेही जोरदार तयारी चालवली आहे.

मावळ लोकसभा मतदार संघात गजानन बाबर आणि श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून दोन वेळा शिवसेनेने भगवा फडकवला आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होणार की नाही हे अद्याप फिक्स नसल्याने भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्रपणे रणनीती आखली आहे. दुसरीकडे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा प्रश्न सुटल्याने इथे राष्ट्रवादी उमेदवाराची चाचपणी करत आहे. मावळ लोकसभा मतदार संघा संदर्भात घेतलेला हा आढावा.

Loading...

राष्ट्रवादी

उमेदवार : राष्ट्रवादी काँग्रसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार
परिस्थिती : आघाडीत मावळ मतदार संघाची ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी लोकसभेसाठी जय्यत तयारी चालू केली आहे. वाघेरे-पाटील हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर आहेत. त्यासोबतच सध्या ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आहेत. वाघेरे यांचे वडील भिकू वाघेरे हेही महापौर होते.

भाऊसाहेब भोईर हे गेल्या काही दिवसांपासून लोकसभेची तयारी करताना दिसत आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मावळातून राजकारणात एंट्री करणार असल्याची जोरदार चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचे सांगत पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढविली. तर, पक्ष बांधणी करणा-या सामान्य कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? असा प्रश्न पवार यांनी मुंबई येथील बैठकीत उपस्थित केला. त्यामुळे पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर मोठे पवार अनुकूल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजप

उमेदवार : आमदार लक्ष्मण जगताप, मावळचे आमदार बाळा भेगडे किंवा माजी आमदार दिंगबर भेगडे, आझम पानसरे
परिस्थिती : भाजपाकडून मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांचा विचार भाजपाच्या कोअर कमिटीमध्ये सुरु आहे. युती होणार की नाही यावर अद्याप ही प्रश्न चिन्ह असल्याने भाजपने स्वतंत्रपणे लढण्याची तयारी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेकडील हा मतदारसंघ खेचून आणण्याची रणनीती आखली गेली.

त्याचबरोबर जगताप यांनी प्राधिकरणात मुख्यमंत्र्यांची सभा घेऊन लोकसभा निवडणुकीचा नारळ फोडल्याची चर्चा आहे. युती न झाल्यास भाजपने जगताप यांना रिंगणात उतरवण्याचे नियोजन केले असल्याची माहिती सध्यातरी मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती करण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून कोणताही निर्णय झाला तरी, मतदारसंघांत भाजपच्या संघटनात्मक बांधणीचे काम अनेक दिवसांपासून सुरूच आहे. भाजपचा उमेदवार कोणत्याही क्षणी रिंगणात उतरवण्याची वेळ आली तरी ते निवडून आणण्याइतकी तयारी भाजपने चालवली असल्याचे यावरून दिसून येत आहे.

तर दुसरीकडे मावळचे आमदार बाळा भेगडे किंवा माजी आमदार दिंगबर भेगडे या दोघांपैकी एकाला मावळलोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

शिवसेना

उमेदवार : विद्यमान खासदार श्रीरंग बारणे
परिस्थिती : मावळ लोकसभा मतदार संघातून खासदार श्रीरंग बारणे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित झालं आहे. कार्यकर्त्यांना आत्तापासूनच कामाला लागण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिल्याचे समजते आहे. काही दिवसांपूर्वी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील पदाधिका-यांशी संवाद साधण्यासाठी उध्दव ठाकरे पुणे दौ-यावर आले होते, त्यावेळी हे आदेश दिल्याचे समजते आहे.

काँग्रेस

मावळ लोकसभा मतदारसंघात कॉंग्रसचे अस्तित्व नगण्य आहे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत पक्षाची कामगिरी सुमार राहिलेली आहे. लोकसभेला राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आघाडी झाल्यामुळे इथे कॉंग्रेस उमेदवाराचा प्रश्न येत नाही.

मनसे

पिंपरी चिंचवड मनपातील एक जागा वगळता सर्व ठिकाणी मनसेला भोपळा मिळालेला आहे. अद्याप मनसेकडून लोकसभा निवडणुकीबाबत कुठलेही स्पष्टीकरण नाही.

काय होऊ शकत?
सध्यातरी शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यात लोकसभेचा सामना रंगणार असल्याचे चित्र आहे.

विधानसभा मतदार संघ आणि बलाबल
पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड, पिंपरी हे विधानसभा मतदार संघ आहेत. भाजप तीन, राष्ट्रवादी एक , शिवसेनेचे दोन असे विधानसभा आमदार बालाबल आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
'हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत'
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलयं, मनसेला घाबरत नाही
मनसेच्या संघटना बांधणीची जबाबदारी बारामतीकराच्या खांद्यावर
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
पुन्हा मोदी सरकार येणार व मी पुन्हा मंत्री होणार : रामदास आठवले
सावधान : मुंबई आणि पुण्यातही आढळले‘कोरोना'चे संशयित रुग्ण