fbpx

मावळ लोकसभेसाठी उमेदवारी ; स्मिता पाटील-थोरात म्हणतात

टीम महाराष्ट्र देशा : मावळ लोकसभेला राष्ट्रवादीकडून शहराध्यक्ष संजोग वाघेरे, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावासोबत आता आर.आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील-थोरात यांचे नाव पुढे आले होते. मात्र आता स्मिता यांनीच या प्रकरणावर भाष्य करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात या नावावरुन सोमवारपासून चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र, मी कधीही मावळमधून निवडणूक लढविण्याचा विचार केला नसल्याचं स्मिता पाटील यांनी ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे तुर्तास तरी या चर्चेला अल्पविराम मिळाला आहे.