fbpx

माऊलींच्या पालखीचा दिवे घाटातून प्रवास

 टीम महाराष्ट्र देशा : ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ असं म्हणत दोन दिवस मुक्कामी असणाऱ्या ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यनगरीतून प्रस्थान झालंं आहे. आज सकाळी सात वाजायच्या सुमारास हडपसरच्या गाडी तळावरील पुलावरून सोलापूर मार्गे तुकाराम महाराजांची पालखी सासवडचा दिवे घाट पार करून पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. एकीकडे पावसाची बरसात तर दुसरीकडे वारकऱ्यांंमध्ये असणारा उत्साह ओसंडून वाहतो आहे.

संत माऊलीचा मुक्काम सासवड येथे तर तुकोबारायांच्या पालखीचा मुक्काम लोणी काळभोर येथे होणार आहे.

टाळ- मृदुगांच्या गजरात दिवे घाट भक्तिमय वातावरणात दंग झाला आहे. कानांवर पडणारे अभंगांचे सूर, विठ्लाच्या भेटीसाठी आतुर झालेले वारकरी विठ्ठल नामात रंगले आहे.

ज्ञानेश्वर माऊलींच्या हिरा अश्वाचा पुणे मुक्कामात मृत्यू

दोन वर्षानंतर तुकाराम मुंडे घेणार कुंभमेळ्याच्या ‘हिशोब’