हद्द झाली… 62 वर्षांच्या पाकिस्तानी खासदार मौलाना सलाहुद्दीनने 14 वर्षाच्या मुलीशी लग्न केले

maulana

पेशावर- पाकिस्तानमध्ये एका राजकीय नेत्याने 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी लग्न केले आहे. या धार्मिक-राजकीय नेत्याचे नाव मौलाना सलाहुद्दीन अयुबी असे आहे आणि ते पाकिस्तानच्या जमीयत उलेमा-ए-इस्लाम पक्षाच्या वतीने खैबर पख्तूनख्वा राज्य स्टेटच्या वतीने पाकिस्तानी संसदेचे सदस्य आहेत.

पाकिस्तानमध्ये मुलींच्या लग्नाचे कायदेशीर वय 16 वर्षे आहे. पण अयुबीने या मुलीशी गेल्या वर्षीच लग्न केले होते. स्थानिक माध्यमांमध्ये मौलाना यांचे वय 62 वर्षे सांगितले जात आहे.ही मुलगी खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या चित्राल शहरातील आहे.

जमीयतचा या शहरात खूप प्रभाव आहे म्हणूनच मौलाना सलाहुद्दीन अयुबीच्या या कारनाम्याबद्दल जगाला माहिती मिळाली नव्हती.एका स्वयंसेवी संस्थेने पोलिसांना याविषयी माहिती दिली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले.

ही मुलगी जुगूरमधील सरकारी शाळेत शिकत होती आणि तिची जन्मतारीख तिथे 28 ऑक्टोबर 2006 रोजी नोंदविण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांनी सांगितले की ते या प्रकरणाचा तपास करत आहेत.

चित्राळ पोलिस स्टेशनचे एसएचओ निरीक्षक सज्जाद अहमद यांनी सांगितले की काही दिवसांपूर्वी एका स्वयंसेवी संस्थेने याबाबत तक्रार दिली होती. त्यानंतर आम्ही तपास सुरू केला आहे.

दरम्यान,मुलीच्या वडिलांनी सुरुवातीला हे लग्न झाले नाही असा पवित्रा घेतला होता पण नंतर जेव्हा सर्व गोष्टी त्याच्या विरोधात जाऊ लागल्या तेव्हा त्याने कबूल केले की हे लग्न गेल्या वर्षी घडले होते. पण मुलीला नांदायला ती 16 वर्षांची होईल तेव्हाच पाठवले जाईल असे सांगून वेळ मारून नेली.

महत्वाच्या बातम्या