मौलानानेच केला मदरशातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार

mit crime

नांदेड : शहरात मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली. एका मदरसा इस्लामिया अरबिया नुरुलील येथे शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे. या प्रकारी आरोपी मौलाना विरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील चुनाभट्टी येथील मदरसा इस्लामिया अरबिया नुरुलील बनात येथे माजलगाव येथिल दोन सख्या बहिणी शिक्षण घेत होत्या. गेल्या सहा महिन्यापासून मदरशातील मौलाना साबेर फारुखी याने स्वतःच्या मोबाईलमध्ये असलेली अश्लिल व्हिडिओ ११ वर्षाच्या अल्पवयीन मुलीस दाखवून तिच्यावर बलत्कार केला. ही घटना कोणाला सांगितली तर मदरशातून नाव काढून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर मौलाना साबेर फारुखी याने तिच्या लहान बहिणीचा विनयभंग केला.

दोन्ही बहिणीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. प्रकरणी मुलीच्या आईने पोलीसात तक्रार दाखल केली. घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक वी.के.यादव यांनी भेट दिली. या गुन्ह्याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक डोईफोडे हे करीत असून मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून रविवारी रात्री इतवारा पोलीस ठाण्यात मौलाना साबेर फारुखी याच्याविरुध्द कलम ३७६ (क) (अ), ३५४ (अ) (९) (३), ५०६ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Loading...