पार्थच्या मदतीसाठी मातोश्री सुनेत्रा पवार उतरल्या प्रचारच्या मैदानात

टीम महाराष्ट्र देशा – आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे वारे सर्वत्र वाहत आहेत. सर्व उमेदवार आपापल्या प्रचार जोरदार करत आहेत. अशातच राष्ट्रवादी नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरले आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार लोकसभा लढवणार आहेत.

पार्थ पवार हे पहिल्यांदाच निवडणूक लढत असल्याने त्यांची थोडी धांदल उडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता आजोबा शरद पवार आणि पिता अजित पवार यांच्यासह खुद्द त्यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार यासुद्धा पार्थ यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत.

मंगळवारी सुनेत्रा पवार यांनी पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पनवेल परिसरात नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी सुनेत्रा पवार यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, एकीकडे प्रचाराची तयरी सुरु असताना दुसरीकडे पार्थ पवार यांच्या कृत्यांमुळे ते सध्या वादाच्या अडकत आहेत. दापोडीतील विनियार्ड चचेर्चे वादग्रस्त फादर पास्टर डेव्हिड सिल्व्हवे यांची पार्थ पवार यांनी भेट घेतली. त्यामुळे आता अंधश्रद्धा धर्मगुरूंची भेट घेतल्याने त्यांना पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आले आहे.