राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक

Rajesh Tope

मुंबई: गेले ४ महिने अविरत राज्यभर काम करणारे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदा टोपे यांचे निधन झाले. राजेश टोपे या कोरोनाच्या महामारीत रात्रंदिवस झुंज देत आहेत. तर, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या मातोश्रीव्या प्रदीर्घ आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते.

काल (१ ऑगस्ट) रोजी रात्री उपचारादरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले. यानंतर राज्यातील सर्वच नेत्यांसह सामान्यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, शारदा टोपे या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज (2 ऑगस्ट) संध्याकाळी ४ वाजता पार्थपूर ता. अंबड जि. जालना या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

तडीपारीच्या नोटिशीनंतर आता मनसे नेते अविनाश जाधव यांना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी

कोरोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली केली आहे (मर्यादीत उपस्थितीची) त्याचे पालन करून अंत्यसंस्कार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. यानंतर, “ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. चार वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती. दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आर्शिवाद दिले. तो आशिर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील,” अशी शोक भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो, शिवसेनच्या खासदाराचा पलटवार

आजारपणामुळे मार्चमध्ये त्या महिनाभर ऍडमिट होत्या. त्यानंतर तब्येत काहीशी सुधारल्यानंतर त्यांना २ महिने घरी ठेवण्यात आले होते. मात्र, गेल्या महिन्यात त्यांची तब्येत पुन्हा बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल रात्री ९ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळल्याने राज्यभरातून कोरोना योद्धा पोरका झाल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.

चंद्रकांत पाटील पुण्याचे, सुट्टीसाठी कोल्हापुरला येतात, तर काहींचं आंदोलन अस्तित्वासाठी: सतेज पाटील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, “आरोग्यमंत्री राजेश टोपे जी यांच्या मातोश्री शारदाताई यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. काही महिन्यांपासून त्या रुग्णालयात असताना देखील राजेश टोपे जी यांनी कोरोनाविरुद्ध लढून महाराष्ट्राची काळजी घेतली. शारदाताई टोपे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना,” असे ट्विट करत दुःख व्यक्त केले.

तसेच, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील, “राज्याचे आरोग्यमंत्री व राज्य मंत्रिमंडळातील माझे सहकारी राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदा अंकुशराव टोपे यांचं निधन हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे. आदरणीय शारदाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली!त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही प्रार्थना!आम्ही टोपे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत,” अशा भावना व्यक्त केल्या.