२१ जुलै रोजी मातंग समाजाचा संघर्ष महामोर्चा

टीम महाराष्ट्र देशा : सार्वोच्च न्यायालयाने अॅट्रोसिटी कायद्यामध्ये शिथिलता आणलेली असल्यामुळे आणि दिवसेंदिवस महाराष्ट्रभर मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय,अत्याचारामध्ये सातत्याने वाढ होत आहे. समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याने या अन्यायाचा निषेध करण्यासाठी व पीडितांना न्याय मिळण्यासाठी तसेच मातंग समाजावर होणारे अन्याय, अत्याचार तात्काळ थांबविण्याकरता अॅट्रोसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी यासाठी २१ जुलै रोजी पुण्यात मातंग समाजाचा संघर्ष महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

गोरखपूर दुर्घटनाप्रकरणी सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Loading...

या महामोर्चाच्या संयोजन समितीचे सदस्य रमेश बागवे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली. या पत्रकार परिषदेला सुभाष जगताप,विष्णूभाऊ कसबे,अनिल हतागळे,प्रकाश वैराळ हे देखील उपस्थित होते.

या मागण्यांसाठी काढण्यात येणार आहे महामोर्चा

  • अनुसूचित जाती करता असलेल्या एकत्रित आरक्षणाचे अ ब क ड प्रमाणे लोकसंख्येनुसार वर्गवारी करण्यात यावी.
  • अॅट्रोसिटी कायद्याची प्रास्ताविक शिथिलता रद्द करून कडक अंमलबजावणी करण्यात यावी
  • क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात व्हावी.
  • भाऊ साठे यांना भारत रत्न पुरस्कार देण्यात यावा
  • आद्यक्रांती गुरु लहूजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी येथील राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरित सुरु करावे
  • मागासवर्गीय महामंडळाकडील सर्व थकीत कर्जे माफ करावीत, १ जानेवारी २०१८ रोजी भिमा कोरेगाव दंगलीतील हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी
  • महाराष्ट्रातील झोपडपट्ट्यांंमधील सरकारमान्य व अवैैध दारू दुकाने तात्काळ बंद करण्यात यावीत                                                                                                                                                                                                                         या  मागण्यांसाठी पुण, पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्यांच्या वतीने शनिवारी, दि २१ जुलै २०१८ रोजी सकाळी ११ वाजता मातंग संघर्ष महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा सारसबाग येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरु होईल.पुठे बाजीराव रोड मार्गे गणपती चौक बेळगाव चौक सोन्या मारिती चौक  आर्यभूषण थियेटर – संत कबीर चौक नेहरू रोड नरपत गिरी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचेल.Loading…


Loading…

Loading...