fbpx

विहिरीत पोहल्यानं अमानुष मारहाण करून काढली मुलांची नग्न धिंड

टीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला काळीमा फासणारी ही घटना जळगाव येथील जामनेर तालुक्यातील वाकडी गावात घडली आहे.मातंग समाजातील काही मुले विहिरीत पोहली म्हणून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यातील वाकडी गावात घडलेल्या या घटनेमुळे महाराष्ट्राची मान शरमेनं खाली गेली आहे.

पीडितांकडून या संदर्भात पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे. मातंग समाजाच्या तीन मुलांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. मात्र ही तक्रार मागे घेण्यासाठी आरोपींकडून दबाव टाकण्यात येतो आहे. विहिरीत पोहल्यामुळे या तिघांची गावातून धिंड देखील काढण्यात आली अशी माहिती समोर येत आहे.

या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.आरोपी सोनू लोहारसह त्याच्या साथीदाराला अटक केल्याची माहिती सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे यांनी दिली आहे. आरोपींवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.