fbpx

‘विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा सन्मान, आयसीसीच्या ‘क्रिकेट हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश’

टीम महाराष्ट्र देशा- भारताचा विक्रमवीर सचिन तेंडुलकर याचा समावेश आयसीसीच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज अॅलन डोनाल्ड आणि ऑस्ट्रेलियाची माजी महिला क्रिकेटपटू कॅथरिन यांनाही हा सन्मान देण्यात आला आहे. हा सन्मान मिळवणारा सचिन हा सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे.

गुरुवारी लंडनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनु साहनी यांनी या नावांची घोषणा केली. आमच्यासाठी हा मोठा सन्मान असून आयसीसीच्या वतीने, या क्लबच्या महान सदस्यांच्या सर्वकालीन यादीत या सदस्यांचा समावेश झाल्याबद्दल मी या तीन खेळाडूंचं अभिनंदन करतो, असं मतं आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनु साहनी यांनी व्यक्त केलं आहे.