मुंबईत अग्नितांडव: कमला मिल्स कम्पाउंडमधे भीषण आग, 14 लोकांचा मृत्यु

16 पेक्षा जास्ती लोक जखमी, आगीच कारण अद्याप समजू शकले नाही

मुंबई: मुंबईत पुन्हा आग्नितांडव आज पहाटेच्या सुमारास पहायला मिळाल. लोअर परेल कम्पाउंड मधील एका हॉटेल व पब मधे आग लागली. यामधे 14 जनांचा गुदमरुन मृत्यु झाला आहे तर अन्य 16 पेक्षा जास्ती लोक यामधे जखमी झाले आहेत. मृतांमधे महिलांच प्रमाण अधिक आहे.

हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पबला गुरुवारी रात्री 12.30 च्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आठ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सहा पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने, तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचं मोठं नुकसान झालं आहे.

आगीत जखमी झालेल्या सहा जणांवर परेलच्या केईएम रुग्णालयात तर दोघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता आणि पोलिस उपायुक्त देवेन भारती यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

हॉटेल वन अबव्हच्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगीची सुरुवात याच रेस्टॉरंट-बारमधून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

You might also like
Comments
Loading...