दुसऱ्यांचं ऐकून सूचना देण्यापेक्षा स्वत: घटनास्थळी हजर राहिलो, पुन्हा दिसली अजित पवारांची तत्परता

मुंबई : मुंबईतील माझगाव येथे असलेल्या जीएसटी भवनाला भीषण आग लागली आहे. इमारतीच्या आठव्या मजल्यावर ही आग लागली आहे. ही भीषण आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे २० बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

तसेच ही आग लेव्हल-3 ची असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार बैठक सोडून घटनास्थळी दाखल झाले आहेत. जीएसटी भवनच्या बाजूला अनेक सरकारी कार्यालये आहेत. आग आटोक्यात यावी यासाठी प्रचंड प्रयत्न सुरु आहेत.

Loading...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. वरचे दोन मजले रिकामे होते तिथे नुतनीकरण सुरु होते. धूर येत असल्याचं समजताच इमारतीमधील कर्मचारी बाहेर पडल्याची माहिती इथे काम करणारे कर्मचारी सुशांत खोब्रागडे यांनी दिली.

दरम्यान, मुंबईतील वाय बी सेंटरमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीची बैठक सुरु होती. यावेळी आगीची माहिती मिळताच अजित पवार बैठक सोडून घटनास्थळी दाखल झाले होते. मुंबईत होतो म्हणून घटनास्थळी वेळेत पोहोचलो. दुसऱ्यांचं ऐकून सूचना देण्यापेक्षा स्वत: हजर राहून सूचना दिलेल्या केव्हाही चांगलं. त्यामुळे तातडीने इथे पोहोचलो अस अजित पवार म्हणाले आहेत. त्यामुळे आपल्या कामामुळे कायम चर्चेत असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तत्परता पुन्हा दिसली आहे.

या ठिकाणी असणाऱ्या कागदपत्रांचे नक्कीच नुकसान झाले आहे, मात्र या सगळ्या कागदांचे ऑनलाईन रजिष्ट्रेशन झालेले होते त्यामुळे सरकारला कोणतीही झळ बसणार नसल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे. तर सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचे देखील अजित पवार यांनी सांगितले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात