CWG2018: सुपर मॉम मेरी कोमचा ‘गोल्डन पंच’

टीम महाराष्ट्र देशा- सुपर मॉम एमसी मेरी कोमने ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. अंतिम सामन्यात तिने नॉर्दर्न आयर्लंडच्या क्रिस्टिना ओहाराचा  5-0असा पराभव केला. अतिशय महत्वपूर्ण अश्या या लढतीत आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत मेरी कोमने हे यश मिळवले.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

तत्पूर्वी पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन आणि ऑलिंपिक ब्राँझपदक मिळवणाऱ्या ३५ वर्षीय मेरी कोमने महिलांच्या ४८ किलो गटाच्या उपांत्य फेरीत श्रीलंकेच्या ३९ वर्षीय अनुषा दिलरुक्षीवर ५-० असा विजय मिळवला होता. पाच वेळा विश्वविजेत्या आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मेरी कोमने बचावात्मक खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या श्रीलंकेच्या दिलरुक्षी कोड्डीथूवाक्कूचा ५-० असा पराभव केला. ही लढत तशी वयस्कर खेळाडूची होती. कारण मेरीचे वय ३५ वष्रे आणि दिलरुक्षीचे वय ३९ वष्रे आहे. मेरीपेक्षा उंची असल्याचा फायदा दिलरुक्षीला उचलता आला नाही. तिला या लढतीत मेरीने झगडायला लावले. अखेरच्या तीन मिनिटांमध्ये मेरीने वेग घेतला.

Shivjal