मार्क्सवादी, आंबेडकरवादी विचारधारेच्या लोकांनी संघटित व्हावे – कन्हैया कुमार

KANHAIYAKUMAR mhd

मुंबई: मार्क्सवादी, आंबेडकरवादी व प्रगतीशील समतावादी विचारधारा यांची संख्या अन्य विचारधारांपेक्षा मोठी आहे. या विचारधारेच्या लोकांनी एकत्रित झाले पाहिजे. यातूनच क्रांती घडेल, असे आवाहन जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांचे नेते कन्हैया कुमार यांनी केले आहे. ‘मुंबई कलेक्टीव्ह’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

सध्या देशात धर्मांधता विष बनत चालले आहे. गावागावात फूट पाडली जात आहे. फॅसिस्ट शक्तींकडून हिंसा सामान्य केली जात आहे. सध्याचे सरकार हे केवळ जाहिरातीचे सरकार आहे. त्यांना विकास होण्याच्या दृष्टीने काहीही पडलेले नाही. त्यामुळे भाजप सरकार विरोधात अन्य विचारांच्या लोकांनी एकत्रित येऊन लढा दिला पाहिजे. देशाचे संविधान व लोकशाहीचे महत्त्व कायम ठेवायचे असेल, तर सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही कन्हैया कुमार यांनी केले.