मारवाडी समाजबद्धलचे वृत्त चुकीचे : शिंदे म्हणतात, वाक्याचा विपर्यास केला गेला

सोलापूर – नागपूर येथे मारवाडी फौंडेशन तर्फे दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरष्कार वितरण समारंभात बोलताना मारवाडी समाजाचे या स्तुत्य उपक्रमाबद्धल कौतूक करून हा समाज जिद्ध चिकाटीच्या जोरावर आर्थिक उन्नती केली आहे असे गौरवोद्गार काढले होते.परंतु एका वाहिनीने वाक्याचा विपर्यास करून मारवाडी समाजबद्धल चुकीचे बोलल्याचे बातमी प्रसिद्ध केली. मात्र आपण असे कोणतेही चुकीचे बोललो नसल्याचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

गेल्या सात वर्षांपासून या कार्यक्रमास जात असतो खरोखर या समाजाचे सामाजिक कार्य चांगले आहे मारवाडी समाज व माझे चांगले संबध आहेत . अशा समाजबद्धलचे प्रसिद्ध झालेले वृत्त चुकीचे आहे. जसजसे निवडणूक जवळ येत आहेत तसे काँग्रेस नेत्याबद्धल अफवा पसरवणे किंवा आरोप करणे असे प्रकार घडत असतात , असेही ते म्हणाले.