मारुती सुझुकी आपल्यासाठी घेऊन आली आहे एक मिनी SUV, जाणून घ्या कोणती आहे ‘ती’ कार

टीम महाराष्ट्र देशा : माणसाच्या काही मुलभूत गरजा आहेत. रोटी कपडा और मकान पण आजच्या वेगवान युगातील माणसाची आणखी एक गरज म्हणजेच चार चाकी गाडी. आता तुम्ही म्हणाल चार चाकी कशाला तर सांगतो. उन्हाळा असु द्या पावसाला असु द्या किंवा हिवाळा असुद्या त्याचा अतिरेक झाला (जास्त थंडी, जास्त पाऊस किंवा जास्त उन्हाळा असेल) तर एकदा तरी का होईना आपल्या मनात हा विचार येतोचं की आपल्याकडे पण एखादी चार चाकी असायला हवी. चिंता नको!

मारुती सुझुकी या कंपनीने S- Presso ही कार काही दिवसांपूर्वीच बाजारात आणली. hatchback प्रकारातील मारुती सुझुकी S-Presso दमदार दणकट आणि attractive कार आहे. या गाडीला इतर hatchback गाड्यांपेक्षा जास्त ground clearance देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला भारतीय रस्त्यावरील खड्यांचा यात जास्त त्रास होणार नाही. त्याच बरोबर आकर्षक interior यात देण्यात आले असून ४ ते ५ लोकांच्या परिवारासाठी ही कार बनवण्यात आलेली आहे. सोबतच या मध्ये entertainment system सुद्धा provide करण्यात आली आहे. एवढेच नाही तर adjustable rear and front seats, adjustable rear and front head rest, rear and front cup holder, 7 inch touchscreen entertainment display, digital speedometer, powerful AC, Power Windows for rear and front side safety साठी airbags आणि जास्त boot स्पेस सह storage capacity पण जास्त देण्यात आली आहे. जेणेकरून गावी जाताना आता सामान कीती आणि कस न्यायचं याच tension राहणार नाही.

एवढ सगळ एकाच गाडीत. तुम्ही म्हणाल हे सगळ ठीक आहे हो पण engine आणि performance च काय. त्यात petrol चे भाव इतके वाढलेत की अश्यात चार चाकी म्हणजे खिशाला भोकं पडायचीच काम आहेत. पण तस नाहीये. यामध्ये 1000 cc चे दमदार इंजिन देण्यात आले आहे. त्यामुळे तुम्हाला २१ ते २२ किलोमीटर इतके उत्कृष्ट mileage ही भेटणार आहे. सध्यातरी petrol मधेच available असणारी मारुती सुझुकी S-Presso ही manual आणि auto transmission अश्या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. तसेच ऐकण्यात आले आहे की, यामध्ये Cruz control mode सुद्धा देण्यात आला आहे.

आता तुम्ही म्हणाल एवढ सगळ एकाच गाडीमध्ये म्हणजे पैसे पण तेवढेच मोजावे लागणार. अजिबात नाही. मारुती सुझुकी ही गाडी आपल्यासाठी फक्त ४ लाखात घेऊन आली आहे. म्हणजे आता तुमचा प्रवास फक्त आनंदी आणि सुखकरच नाही तर सुसाट आणि सुरक्षित पण होणार आहे.