मारुती सुझुकी करत आहे सात सीटर ‘Wagon R’ लाँच

टीम महाराष्ट्र देशा : मारुती सुझुकीने नुकतीच Wagon R भारतीय बाजारात नव्या रुपात लाँच केली आहे. आता मारुती सात-सीटर Wagon R लाँच करणार आहे. ही कार मारुतीच्या शोरुममधून नाही तर नेक्साच्या डिलरशीपमधून विक्रीस उपलब्ध केली जाणार आहे. नेक्साद्वारे मारुतीच्या प्रिमिअम कारची विक्री केली जाते. मात्र, या कारच्या लाँचला विलंब होत आहे. याचे कारण म्हणजे Wagon R च्या विक्री मंदावल्याचे बोलले जात आहे.

मारुती सुझुकीने यंदा जानेवारीमध्ये Wagon R लाँच केली होती. ही कार Heartect प्लॅटफॉर्मवर बनविण्यात आली आहे. या कारला नवीन रुप देताना काही प्रमाणात कारचा आकार वाढविला आहे. ही कार जास्त प्रिमिअम कशी वाटेल याकडे कंपनीने लक्ष दिले आहे. मारुतीची कार असल्याने विक्री जरी जास्त असली तरीही जुन्या कारच्या तुलनेत कमी आहे. कारण बाजारातही सुस्ती आलेली आहे.
या वॅगन आरची 7 सीटर कार आल्यास तिची विक्री जास्त होईल. या कारमध्ये मूळ कारपेक्षा जास्त फिचर्स देण्यात येतील. या कारला टक्कर देण्यासाठी रेनॉल्टची ट्रीबर MPV येणार आहे.

मारुती या कारमध्ये 1.2 लीटरचे के सिरिजचे पेट्रोल इंजिन देण्याची शक्यता आहे. हे इंजिन 82 बीएचपीची ताकद देते. गिअरबॉक्स 5 स्पीड मॅन्युअल आणि अटोमॅटीक असणार आहे. तसेच ही कार भविष्यात हायब्रीड आणि इलेक्ट्रीक मध्येही येण्याची शक्यता आहे. तर ७ लाखांच्या आस पास या कारची किमत असणार आहे.