fbpx

३५ वर्षांनतर मारुती ओमनीचं उत्पादन बंद !

टीम महाराष्ट्र देशा : ३५ वर्षे जुन्या मारुती सुझुकी ओमनी (Omni) या मॉडेलचं उत्पादन बंद करण्याचा निर्णय कंपनीनं घेतल्याचं सध्या सांगण्यात येत आहे.ऑटोमोबाइल क्षेत्रातील दिग्गज मारुती कंपनीने १९८४ साली मारुती सुझुकी ओमनी ही कार लाँच केली होती. ३५ वर्षांनतरही ओमनीची विक्री मोठ्या प्रमाणात होत होती. परंतु नवीन रस्ते सुरक्षा नियम लागू झाल्यानंतर तिचं उत्पादन बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

सरकारने एबीएस, एअरबॅग्ज आणि बीएसव्हीआय बंधनकारक केल्यानंतर अनेक ऑटोमोबाइल कंपन्यांनी जुन्या कारचे उत्पादन बंद केले आहे. मात्र भारतात ओमनीने आपले एक वेगळेच स्थान बनवले होते आणि ती प्रचंड लोकप्रिय देखील होती.