हुतात्मा मेजर राणे यांच्या पत्नी कनिका राणे झाल्या ‘लेफ्टनंट’

राणे

मुंबई : मेजर राणे हे ऑगस्ट २०१८ मध्ये काश्मीरच्या गुरेझ भागात दहशतवाद्यांशी लढताना हुतात्मा झाले होते. कौस्तुभ यांच्या पत्नी कनिका या मुंबईत एका ठिकाणी नोकरी करीत होत्या. पती हुतात्मा झाल्यानंतर मात्र कनिका यांनी स्वतःहून लष्करात दाखल होण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार परीक्षा तसेच मुलाखतीत अग्रेसर येत त्यांची प्रशिक्षणासाठी मागील वर्षी निवड झाली. हे प्रशिक्षण पूर्ण करीत त्या आता लष्करात अधिकारी झाल्या आहेत. कनिका यांनी मात्र मुलगा लहान असताना देखील नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण दूर चेन्नईत राहून घेतले. कनिका यांचा मुलगा लहान असून  देखील त्यांनी बरेच परिश्रम करून त्या  लष्करात अधिकारी झाल्या. मोट्या जिद्दीने आणि कष्टाने त्यांनी आपले स्थान निर्माण केले.

हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका या ‘लेफ्टनंट’ झाल्या असून, चेन्नईच्या अधिकारी प्रशिक्षण अकादमीत (ओटीए) नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करीत त्यांनी शनिवारी लेफ्टनंट पदाचे दोन ‘स्टार्स’ खांद्यावर चढवले.

महत्वाच्या बातम्या