शहीद औरंगजेबचे वडील भाजपच्या वाटेवर

टीम महाराष्ट्र देशा- जम्मू-काश्मीरमध्ये काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी भारतीय लष्करातील जवान औरंगजेब यांचे अपहरण करुन त्यांची निर्घृण हत्या केली होती . आता याच वीर सुपुत्राचे वडील मोहम्मद हनीफ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ३ फेब्रुवारी रोजी भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या वर्षी जूनमध्ये ईद साजरी करण्यासाठी घरी जात असलेल्या औरंगजेब यांचं दहशतवाद्यांनी अपहरण केलं होतं. यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. दहशतवाद्यांनी झाडलेल्या गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न झालेला त्यांचा मृतदेह पुलवामा जिल्ह्यातील गुस्सू भागात सापडला होता.

दरम्यान,राष्ट्रीय रायफल्सचे शहीद जवान औरंगजेब यांना हिंदुस्थानी लष्कराने शौर्य चक्र देऊन सन्मानित केले आहे. औरंगजेब यांना शौर्य व बलिदानासाठी हा सन्मान देण्यात आला आहे.