fbpx

मार्टिन गुप्टीलचा तडाखा : ३८ चेंडूत ठोकल्या तब्बल १०२ धावा

टीम महाराष्ट्र देशा- शुक्रवारी इंग्लंडच्या स्थानिक टी-२० क्रिकेट स्पर्धेत, न्यूझीलंडच्या मार्टीन गप्टीलने आक्रमक खेळी केली आहे. वूस्टरशायर संघाकडून खेळत असताना गप्टीलने ३८ चेंडूत १०२ धावा केल्या. त्याच्या या वादळी खेळीच्या जोरावर वूस्टरशायर संघाने नॉर्थमटनशायरवर ९ गडी राखून मात केली. वूस्टरशायर संघाला सामना जिंकण्यासाठी १८८ धावांचं आव्हान देण्यात आलं होतं.

या विक्रमाने मार्टिन गुप्टील जलद शतकवीरांंच्या यादीत संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर बसला आहे. या यादीत 30 चेंडूत शतक ठोकणारा वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर ऋषभ पंतचा क्रमांक लागतो. त्याने 32 चेंडूत शतक मारले आहे. 34 चेंडूत शतक करणारा अँड्र्यू सायमंडस तिसऱ्या स्थानावर आहे. यानंतर डेव्हीड मिलर, रोहित शर्मा, वॅन डर वेस्टथुयिजन यांच्यासोबत मार्टिन गुप्टील चौथ्या स्थानावर विराजमान झाला आहे.

महाराष्ट्रातील गुन्हेगारी दर वाढला; मुख्यमंत्र्यांची चिंता वाढणार

तर देशाचे दोन तुकडे करू… मुझप्फर हुसैन