fbpx

शिवसेना आमदार गोरेंच्या लक्षवेधीमुळेच चाकणमधील मराठा आंदोलकांचे अटकसत्र 

Section 144 applies to Chakan

पुणे : 30 जुलै 2018 रोजी मराठा आंदोलनाला चाकणमध्ये हिंसक वळण लागले  होते. यावेळी शेकडो आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. सध्या गुन्हे दाखल करण्यात आलेल्या आंदोलकांचे अटकसत्र सुरू आहे. स्थानिक शिवसेना आमदार सुरेश गोरे यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडल्यानेच चाकण भागातील निरपराध मराठा आंदोलकांची धरपकड केली जात असल्याचा दावा मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आला आहे.

पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत मराठा क्रांती मोर्चाकडून हा दावा करण्यात आला आहे. यावेळी समन्वयक मनोहर वाडेकर, संतोष नानवटे, भगवान मेदनकर, विजय खाडे, राहुल नायकवडी उपस्थित होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले असले तरी त्यासाठी लढा देताना अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये चाकणमधील हिंसाचारा दरम्यान गुन्हे दाखल करण्यात आलेल्या आंदोलकांचा देखील समावेश आहे. येथील हिंसाचारात पाच ते सहा कोटींचे नुकसान झाले होते. यामध्ये काही समाजकंटकांनी घुसखोरी करत आंदोलनाला गालबोट लावल्याचा दावा मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आला होता. दरम्यान, मराठा आंदोलकांवर राज्यभरात दाखल करण्यात आलेले गुन्हे सात दिवसांत मागे घ्यावेत अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे.

मराठा आरक्षण कायद्याला मुंबई हायकोर्टात आव्हान

1 Comment

Click here to post a comment