शेत तळ्यात उडी मारुन विवाहीत उदृयोजकाची आत्महत्या, आत्महत्येस प्रवृत्त करणारी तरुणी गजाआड

औरंगाबाद : प्रेमाच्या जाळ्यात अडकवून वारंवार पैशांची मागणी करणार्या तरुणीच्या जाचाकंटाळून विवाहीत उद्योजकाने शेत तळ्यात उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना 9 एप्रिल रोजी फेरनजळगाव गट. नं. 190 येथील शेतता उघडकीस आली. गुन्ह्यात करमाड पोलिसांनी तपासक करुन एका तरुणीला शनिवारी दि.10 पहाटे अटक केली. साक्षी गौतम गंगवाल (23, रा. विष्णुनगर, मित्र नगर, जैन गल्र्स हॉस्टेल) असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे.

प्रकरणात मयत शरद उत्तम शेळके (34, रा. फेरणजळगाव ता.जि. औरंगाबाद, ह.मु. विष्णु नगर) यांचे वडील उत्तम शेळके (68) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, फिर्यादीचे फेरनजळगाव गट. नं. 190 येथे शेत असून तेथे शेत तळे देखील तयार करण्यात आले आहेे. दरम्यान फिर्यादीचा मुलगा शरद शेळके हा विवाहीत असून त्यांची शेंद्रा येथे श्री समर्थ इंटरप्रायजेस नावाची डिस्पोजल कपची निर्मीती करण्याची कंपनी आहे.

घटना घडण्याच्या दहा ते पंधरा दिवसांपासून शरद हा नाराज होता व घरात कोणाला काही बोलत नव्हता. चार पाच दिवसांपूर्वी फिर्यादीने शरदला विश्र्वासात घेवून चौकशी केली. तेंव्हा शरदने साक्षी गंगवाल नावाच्या मुलीने प्रेमात अडकवले असून ती आता शरीरिक व मानसीक त्रास देत आहे. तिला राफे काझी नावाचा मुलगा मदत करित असल्याचे सांगितले. त्यावर फिर्यादीने यावर एक दोन दिवसात तोडगा काढू असे सांगितले.

8 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजात शरद हा नेहमीप्रमाणे कंपनीत जातो म्हणून घरातून निघाला होता. 9 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता फिर्यादीला शेतातील बटाईदार भगवान शेळके याने फोन करुन शरद हा शेत तळ्यात बेशुध्द अवस्थेत पडलेला असल्याचे सांगत, शरदला उपचारासाठी घाटीत दाखल केल्याचे सांगितले.

त्यानूसार फिर्यादी घाटीत गेले असता, डॉक्टरांनी शरदला मृत घोषीत केले. त्यावेळी भगवान शेळके याने शेत तळ्यावर शरदच्या उभ्या दुचाकीवरील बॅग फिर्यादीला दिली. फिर्यादीने बॅग तपासली असता, त्यात शरदने लिहलेली आठ पानी चिठ्ठी त्यांच्या हाती लागली. ती संपूर्ण वाचल्यानंतर साक्षी गंगवाल हिने शरदला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यास शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास दिल्याचे समोर आले.

तसेच साक्षीचा प्रियकर राफे काझी याने साक्षी सोबत मिळुन शरदला मारण्यासाठी माणसे पाठवल्याचे देखील उघड झाले. साक्षी ही शरदला पैशांसाठी ब्लॅकमेल करित होती, या जाचाला कंटाळूनच शरदने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. प्रकरणात करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी तपास करुन साक्षी गंगवाल हिला आज पहाटे अटक करुन न्यायालयात हजर केले असता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच.एस. पुराडउपाध्ये यांनी तिची न्यायालीयन कोठडीत रवानगी केली.

महत्त्वाच्या बातम्या