रिझर्व्ह बँक ऑफ लव्ह!…का होतेय ही लग्न पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल ?

marriage invitation indian money

टीम महाराष्ट्र देशा- लग्न असो की दुसरा कोणता कार्यक्रम मित्रपरिवाला निमंत्रण देण्यासाठी आपल्याकडे खास निमंत्रण पत्रिका देण्याची प्रथा आहे. यामुळेच पत्रिका आकर्षक बनवण्याचा आपला आग्रह असतो. सध्या अशीच एक लग्न पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

patrikaa 2

लग्नाचे निमंत्रण मित्रांना, नातलगांना, पाहुण्यांना देण्यासाठी लग्न पत्रिका काढली जाते. परंतु काळाच्या ओघात पत्रिकेचे स्वरूप बदलले आहे. सोलापूर जिल्ह्यातील ही लग्नपत्रिका सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाली असून २ हजार रुपयांच्या नोटेवर हि पत्रिका छापली आहे की काय असा क्षणभर भास होतो. बसवराज प्रचंडे आणि रेखा व्हसुरे यांच्या लग्नाची हि पत्रिका सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनत आहे.

patrika 11

या पत्रिकेवर अतिशय कल्पकतेचा वापर करून रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या ऐवजी रिझर्व बँक ऑफ लव्ह असं लिहण्यात आलं आहे तर २००० रुपयांच्या ऐवजी लग्नाची तारीख छापण्यात आली आहे. नेटकरी मंडळींच्या पसंतीला उतरलेल्या या पत्रिकेबद्दल एका बाजूला कौतुक होत असताना काहींनी देशाच्या चलनाचा पत्रिकेसाठी असा वापर करणे योग्य नसल्याचं देखील म्हटलं आहे.काहीही असलं तरी ‘हौसेला काही मोल नसतं’ असं म्हटलं जातं आणि त्याचाच प्रत्यय हि लग्न पत्रिका पाहून येतो.