मार्केटयार्ड परिसरात तरुणाचा शस्त्राने वार करुन खून

पुणे  : मार्केटयार्ड परिसरात गेट नंबर एकजवळ एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला. ऐन वर्दळीच्या परिसरात ही घटना घडल्याने परिसरात दहशत माजली आहे. सनी विलास शिंदे(19) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तीन चार व्यक्तींनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले.

यामध्ये जागेवरच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी खबर मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही घटना रात्री झाल्याचे कळते. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते