उद्योजक आणि ग्राहकांना जोडणार नवीन अॅप उपलब्ध

व्यावसायिकांसाठी एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म

पुणे, बुधवार 5 जुलै 2017:बाजारात ग्राहकांसाठी नवीन अॅप आले आहे.
प्रभावी शोधक्षमता आणि शेकडो लोकांना  साइन अप करण्यासाठी मार्केट हंटर पूर्णपणे सक्षम आहे. व्यावसायिक आणि ग्राहकांमध्ये अर्थपूर्ण भागीदारी आणण्याचे काम हे अॅप सक्षमपणे करते.
हे अॅप व्यावसायिक, मार्केटहंटर पीआरओ यांना त्यांचे स्वतःचे व्यावसायिक ब्रँड तयार करण्याची अनुमती देते. यात स्वतःला बाजारपेठेत सिद्ध करण्यासाठी  आवश्यक असलेल्या सर्व उपकरणांचा समावेश होतो. एक सोशल-मिडिया ऑप्टीमाइज़्ड,  प्रोफाईल शेयरींग टूलच्या माध्यमातुन स्वताची प्रोफाईल आणि व्यवसायीक कार्ड ग्राहकांना पाठविण्याची सुविधा आहे. येथे व्यावसायिक स्वत:ला शोधण्यायोग्य बनू शकतात आणि इंटरनेट शोधाद्वारे ग्राहक त्यांना सर्च करू शकतात. याचबरोबर हे प्रोफेशनल्स देखील ग्राहकांच्या प्रोफाईल्स आणि घडामोडींचे विश्लेषण करू शकतात.
ह्या अॅपवरती ग्राहक सर्व प्रकारची कौशल्य, लोकप्रिय अथवा अन्य  व्यवसायिकांना शोधू शकतात आणि त्यांच्या कार्याचा योग्य तपशील घेऊ शकतात. सोशल टूल्स मार्केटिंगच्या माध्यमातुन ग्राहकांना व्यावसायिकांच्या प्रोफाईल बरोबरच त्यांच्या कुटुंब आणि मित्रपरिवारांची माहितीदेखील मिळते.मार्केटहंटर संपूर्ण जगभरात आणि प्रत्येकासाठी खुले अॅप आहे.
मार्केटहंटर पीआरओ मध्ये सामील होणाऱ्या  व्यावसायिकांना १ वर्षाचा अॉक्सेस मोफत मिळेल. हा विनामूल्य प्रवेश प्रत्येक शहरातील निवडल्या गेलेल्या पहील्या १००० व्यवसायिकांना मिळेल.मार्केटहंटर आणि मार्केटहंटर पीआरओ गुगल प्ले स्टोअरवरती देखील उपलब्ध आहे. अशी माहिती आज मार्केटहंटर चे संस्थापक आणि सहसंस्थापक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

You might also like
Comments
Loading...