जिन्सीत जागा खरेदी करतांना बाजार समितीने डावलले नियम; माजी सभापती राधाकिसन पठाडेंचा आरोप!

जिन्सीत जागा खरेदी करतांना बाजार समितीने डावलले नियम; माजी सभापती राधाकिसन पठाडेंचा आरोप!

radhakisan pathade

औरंगाबाद : बाजार समितीच्या प्रशासक मंडळाने जिन्सीतील जागा विक्री टेंडरमधील अटी शर्तींचे पालन न करता नियम डावलत कायद्यातील अधिकार नसतांनाही विनापरवानगी तुकडे करीत खरेदी खत करून दिले. हे बेकायदेशीरपणे झाले असून याबाबत चौकशी करीत अशासकीय प्रशासक मंडळ बरखास्त करण्याची मागणी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेकडे केल्याची माहिती माजी सभापती राधाकिसन पठाडे (Radhakisan pathade) यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

पठाडे म्हणाले की, जिन्सीतील ही जमीन आजच्या बाजारभावानुसार ३७ कोटी ५० लाख रुपये किंमतीची आहे. या जमिनीची अवघ्या २१ कोटी ७५ लाख रुपयांत विक्री केली. जिन्सी येथे बाजार समितीच्या मालकीची १५,६४५ चौ.मी. जागेची विक्री करण्यासाठी प्रशासकीय मंडळाने १५ मे रोजी निविदा काढली होती. सर्वाधिक किंमतीची जागेचा कोटी ७५ लाख रुपयांची निविदा शौर्य मंडळाच्या असोसिएशने दाखल केली होती.

न्यायालयाच्या आदेशानुसार शौर्य असोसिएटसला या जमिनीचे खरेदीखत करून देणे अपेक्षित होते, परंतु मुख्य प्रशासक व प्रशासकीय मंडळाने जमिनीचे तुकडे पाडून तब्बल ११ जणांना खरेदीखत करून दिले आहेत. यावेळी १५ दिवसाची मुदत देतो, यांची चौकशी न झाल्यास उपोषण करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. या प्रकरणी आम्ही न्यायालयातही जाणार आहोत. बाजार समितीत कामे सुरु होत नसल्याचाही आरोप पठाडे यांनी केला. यावेळी श्रीराम शेळके, भागचंद ठोंबरे, दामोदर नवपुते उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या