करमाळा : बागल गटाचे मनोधैर्य वाढवणारी तर विरोधकांना आत्मचिंतन करायला लावणारी निवडणूक

करमाळा- बहुचर्चित करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली असून बागल गटाचे मनोधैर्य वाढवणारी ठरली असून विरोधक असलेले पाटील-जगताप गटाला आत्मचिंतन करणारी निवडणूक ठरली आहे.

करमाळा बाजार समितीच्या १८ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती अगोदरच व्यापारी मतदारसंघातून दोन जागा तर हमाल/तोलार मतदारसंघातून एक जागा बिनविरोध झालेली होती. शेतकरी मतदारसंघातील १५ जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली या निवडणूकीत बागल गटाला ८ जागा, पाटील-जगताप गटाला ६ जागा तर शिंदे गटाला १ जागा मिळाली असून करमाळा बाजार समिती त्रिशंकू झालेली असली तरी मतांचे विभाजन केले तर आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बागल गटाचे मनोधैर्य वाढवणारी मते मिळालेली असून पाटील-जगताप गटाला आत्मचिंतन करणारी मते मिळालेली आहेत .  शिंदे गटाला मिळालेली मते आगामी निवडणूकीत चमत्कार घडवणारी आहेत.

प्रथमच शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार असलेल्या बाजार समिती निवडणूकीत एकूण मतांपैकी बागल गटाला १८ हजार ४४५ मते, पाटील-जगताप युतीला १६ हजार २५१ मते तर शिंदे गटाला १३ हजार ३०५ मते मिळालेली आहेत. ही मते आगामी विधानसभेला निर्णायक ठरू शकतात त्यामुळे बागल गटात उत्साहाचे वातावरण आहे तर आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांना धक्का देणारी आहे तसेच शिंदे गटाने घेतलेल्या आश्चर्य मतांमुळे जि प अध्यक्ष संजय शिंदे यांचे मनोबल नक्कीच वाढलेले आसणार

कुर्डूवाडी बाजार समितीमध्ये गैरव्यवहार; संजय शिंदे यांच्या अडचणीत वाढ