मार्क झुकरबर्गची मोठी घोषणा; ‘फेसबुक’चे नाव बदलून ठेवले ‘हे’ नवे नाव

मार्क झुकरबर्गची मोठी घोषणा; ‘फेसबुक’चे नाव बदलून ठेवले ‘हे’ नवे नाव

fecebook

नवी दिल्ली: सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग कंपनी असणाऱ्या फेसबुकने आपलं नाव बदललं आहे. रिब्रॅण्डींगच्या उद्देशाने हा नवीन बदल करण्यात आल्याचे फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गने म्हटले आहे. याबाबतीत मार्क झुकरबर्ग यांनी मोठी घोषणा केली आहे. फेसबुक या नावाखाली कंपनी जे काम करते ते योग्य वाटत नसल्याने कंपनीने मूळ कंपनीचं म्हणजेच पॅरेंट कंपनीचं नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याचं झुकरबर्ग यांनी म्हटले आहे. त्यांनी याबाबत फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे.

दरम्यान यापुढे आपण मेटाव्हर्स पद्दतीने उत्पादने निर्माण करुन वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी नाव बदलत असल्याचे झुकरबर्ग यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता सांगितलं आहे. फेसबुकचं नवं नाव मेटा असणार आहे. मेटाव्हर्स म्हणजेच व्हर्चूअल विश्वाला अधिक प्राधान्य देण्याची भूमिका. इंटरनेटच्या माध्यमातून लोक जेव्हा व्हर्चूअल विश्वामध्ये भ्रमंती करतात त्याला मेटाव्हर्स असं म्हणतात.

डिजीटल स्पेस म्हणजेच व्हर्चूअल रिअ‍ॅलिटी आणि ऑगमेन्टेट रिअ‍ॅलिटीसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभं केलेलं आभासी जग. सध्या आम्ही जे काम करतोय त्यासाठी फेसबुक हे नाव पुरेसं आणि सर्वसामावेशक वाटत नाही. म्हणूनच यापुढे आम्ही मेटा या नावाने ओळखले जाणार आहोत, असं मार्क झुकरबर्ग यांनी म्हटले आहे. तर केवळ नावच नाही तर कंपनीने आपला लोगोही बदलला आहे. आता फेसबुकच्या एफऐवजी इन्फीन्टीचं चिन्हं हे कंपनीचा लोगो असणार आहे. सध्या फेसबुक या ब्रॅण्डखाली या कंपनीच्या उप कंपन्या आहेत. यामध्ये खास करुन फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप, ऑक्युलस आणि इतर कंपन्यांचा समावेश आहे. हे नामकरण करताना सध्या असणाऱ्या सेवा आणि अ‍ॅपची नावं बदलली जाणार नाहीत असं मार्क झुकरबर्गने स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या