केम्ब्रिज अॅनॅलिटिका प्रकरणी मार्क झुकरबर्गचा ‘माफीनामा’

टीम महाराष्ट्र देशा : २०१७ साली अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मदत करणाऱ्या ‘केम्ब्रिज अॅनालिटिका’ या कंपनीने जवळपास 5 कोटी फेसबुक यूजर्सची वैयक्तिक माहिती चोरली, असा आरोप करण्यात आला होता. या चोरलेल्या माहितीचा निवडणुकीत वापरही केला गेला, असाही आरोप आहे. यावरुन अमेरिकेसह जगभरात आता खळबळ उडाली आहे. आता प्रकरणावरून फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गने फेसबुक वर भली मोठी पोस्ट लिहून आपला माफीनामा सादर केला आहे.

लोकांची माहिती नेमकी कशी लीक झाली, नेमक्या कुठे त्रुटी राहिल्या, याच शोध घेऊ आणि भविष्यात अशी चूक पुन्हा होणार नाही, अशी ग्वाही मार्क झुकरबर्गने दिली आहे.

केम्ब्रिज अॅनॅलिटिका काय आहे?

केम्ब्रिज अॅनॅलिटिका ही सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि डिजिटल सपोर्ट या क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. गेल्या 25 वर्षांपासून ही कंपनी कार्यरत असून, जगातील अनेक देशांमध्ये सुमारे 100 हून अधिक कॅम्पेन्स या कंपनीने केले आहेत. राजकीय निवडणुकांमध्ये एखाद्या विशिष्ट पक्षासाठी काम करत, त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे व त्यांच्या मतामध्ये परिवर्तन करण्याचे काम कॅम्ब्रिज अॅनॅलिटिका करते.