मुंबई : उद्धव ठाकरे जनतेला कितीवेळा भेटले मंत्रालयात कितीवेळा गेले, असा सवालही दीपक केसरकरांनी विचारला. तसेच आमच्या एकही प्रश्नांची उत्तर त्यांनी दिलं नाही. आघाडी तोडा हे आम्ही सांगत होतो, मग कटकारस्थान केलं हे का बोलताय, असंही दीपक केसरकर यावेळी म्हणाले.
आज आमच्या खासदारांच्या घरावर मोर्चे काढले जात आहे. कुणाच्या घरावर मोर्चा काढण्याचा अधिकार कुणी दिला?, असं दीपक केसरकर म्हणाले. लोकांच्या घरावर आंदोलनं करणं आता थांबवा. राज्यातील जनतेला शांतता हवी आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देऊ नका. राजकारण करा, मुलाखती द्या, पण हे कुठेतरी थांबवा, असं आवाहन दीपक केसरकरांनी केलं.
महत्वाच्या बातम्या :
- ajit pawar | बहुमत आहे तर मंत्रिमंडळ विस्तार का नाही?- अजित पवार
- Pravin Darekar | सत्ता असतानाच फिरले असते तर आता गट्टी जमवण्याची वेळ आली नसती – प्रवीण दरेकर
- Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांना मातृशोक; शरद पवारांनी पत्र पाठवत केले सांत्वन
- Rahul Shewale | दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवावा – राहुल शेवाळे
- Ajit pawar | तिरुपती देवस्थान संदर्भात व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंवर अजित पवार म्हणाले, …
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<