fbpx

रामटेकडी कचरा डेपो विरोधात सर्वपक्षीय रस्त्यावर; आमदार टिळेकरांच्या कार्यालयावर फेकला कचरा

हडपसरमधील रामटेकडी येथे नवीन कचरा प्रकल्प उभारण्याचा घाट महापालिकेकडून घालण्यात आला आहे. मात्र या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा मोठा विरोध पहायला मिळत आहे. तर आज सर्वपक्षीय नेत्यांनी मोठा मोर्चा काढत कचरा प्रकल्प विरोधाची धार आणखीन तीव्र केली आहे. यावेळी आंदोलकांकडून भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या कार्यालयावर कचरा फेकण्यात आला.

रामटेकडी येथे महापालिकेच्या वतीने ७०० टनाचा मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला जाणर आहे. त्याचे काम सुरू होताच हडपसर मधील स्थानिक नगरसेवकांनी नागरिकांच्या माध्यमातून या प्रकल्पाला विरोध सुरू केला आहे. असे असताना देखील प्रशासन आणि सत्ताधारी तिथेच प्रकल्प उभारण्यावर ठाम आहे. त्यामुळे आता भाजप वगळता सर्वपक्षीय नेत्यांनी रस्त्यावर उतरून आपला विरोध दर्शवण्यास सुरुवात केली आहे.

ससाणे नगर येथून या मोर्चाला सुरुवात झाली तर रामटेकडी कचरा प्रकल्प स्थळी याचा समारोप करण्यात आला. या मोर्चात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, विरोधीपक्ष नेते चेतन तुपे, हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे, माजी आमदार महादेव बाबर, बाळासाहेब शिवरकर तसेच सर्वपक्षीय नगरसेवक आणि स्थानिक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1 Comment

Click here to post a comment