मराठवाडा पारतंत्र्यातून मुक्त झाला, पण समस्यांमधून मुक्त करण्यासाठी आघाडी सरकार साथ देईल का?

Sambhaji Patil Nilangekar

लातूर : आजही मराठवाडा हा शेतकरी पिक विमा, आत्महत्या, शिक्षण, खराब रस्ते, दुष्काळ, देशोधडीला लागलेला शेतकरी, उद्योग व्यवसायला न मिळालेला वाव अशा समस्यांनी व्याप्त आहे. या सर्वांवर मात करण्यासाठी आघाडी सरकार साथ देईल का? असा प्रश्न आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी उपस्थित केलाय. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शुभेच्छा देतानाच त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय.

या संदर्भात आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की, ‘मराठवाडा ही मंदिरांची भूमी आहे. प्रार्थना स्थळे हे सर्वांचे श्रद्धास्थान असून लाखो नागरिकांच्या उपजीविकेचे साधन आहेत, मात्र राज्य सरकार ते उघडण्यासाठी आग्रही नाही. राज्य सरकारने मराठवाड्याकडे विशेष लक्ष देण्याची हीच खरी वेळ आहे. मराठवाड्यातील वंचित, विद्यार्थी, शेतकरी, सर्वसामान्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा, त्यासाठी संघर्ष करण्याचा संकल्प आज घेवूया.’

मराठवाड्यात ओला दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी निलंगेकर यांच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यात येण्याचा अधिकारच नसल्याचे म्हटले होते.

महत्त्वाच्या बातम्या