fbpx

३० जुलैपर्यंत मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडणार ; बबनराव लोणीकरांची माहिती

Babanrao-Lonikar

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रासह देशात मान्सूनचे आगमन झाले असले तरीही मराठवाड्यात मात्र समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे मराठवाड्यात ३० जुलैपर्यंत कृत्रिम पाऊस पाडण्यात येईल अशी माहिती पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.

मराठवाड्यातील पर्जन्याविषयी बोलताना लोणीकर यांनी ‘मराठावाड्यात कमी पावसामुळे नागरिकांची चिंता वाढली आहेत. त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या दृष्टीने राज्य मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे. राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याच्या दृष्टीने लागणाऱ्या परवानग्यांसाठी केंद्र सरकारकडे अर्ज केले आहेत, त्या परवानग्या लवकरच मिळणार आहेत. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी लागणाऱ्या विमानाला औरंगाबाद विमानतळावरुन उड्डाणाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी लागणारी रडार यंत्रणेचीही परवानगी घ्यावी लागणार आहे अशी माहिती लोणीकर यांनी दिली आहे.

दरम्यान, मराठवाड्यात पावसाचं प्रमाण अतिशय कमी आहे. आतापर्यंत १२२ मिमी पावसाची नोंद याठिकाणी झाली आहे. एवढ्या कमी पर्जन्यमानामुळे मराठवाड्यात कृत्रिम पावसाची गरज आहे.