मराठवाडा साहित्य परिषदेने नियोजित कार्यक्रम पुढे ढकलले

औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेने आपले नियोजित कार्यक्रम पुढे ढकलले असल्याची माहिती परिषदेकडून देण्यात आली आहे. कोरोनाचे वाढते संकट बघता, आणि सतत वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी कठोर अंमलबजावणीचे आवाहन केले आहे. त्याच धरतीवर कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दिनांक 24 फेब्रुवारी 2021 रोजी डॉ. सुधीर रसाळ यांचा मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार मिळाल्यामुळे होणारा जाहीर सत्कार समारंभ पुढे ढकलण्यात आला आहे. 27 फेब्रुवारी 2021 रोजी कविता दिनाच्या निमित्ताने काव्यपुरस्कार वितरण समारंभ स्थगित करण्यात आला आहे. 3 मार्च 2021 रोजी प्राचार्य डॉ. प्रतापराव बोराडे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यासाठी सोहळा देखील पुढे ढकलला जात आहे.

सर्व कार्यक्रम सध्यापुरते स्थगित करण्यात आले असले तरी हे कार्यक्रम पुढे कधी होणार याची रूपरेषा ठरविल्यानंतर याची माहिती देण्यात येणार असून, सध्याची कोरोना परिस्थिती पाहता हे कार्यक्रम सध्या घेणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या