इंग्लंडचा धुव्वा; ‘विराट’ विजयासह मालिकेत भारताची 3-0 ने आघाडी

मुंबई: क्रिडाप्रेमिंच्या आदराचे स्थान असलेले वानखेडे स्डेडियम आज पुन्हा एकदा ऐतिकाहासिक क्षणांचे साक्षिदार झाले. इंग्लंड विरूद्ध झालेलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेत भारताने इंग्लंडचा 1 डाव 36 धावांनी धुव्वा उडवला. पाचव्या दिवशी खेळाला सुरूवात झाली तेव्हा, भारताने इंग्लंडचा डाव अवघ्या 195 धावांत गुंडाळला

पहिल्या डावापासूनच अश्विनची फिरकी जोरात चालली. अश्विनने पहिल्या डावातच सहा गडी बाद केले. तर, कर्णधार विराट कोललीने इग्लंडने पहिल्या डावासाठी ठेवलेल्या 400 धावांचा पाटलाग करताना कसोटी कारकिर्दीतील उत्कृष्ट खेळी करत 235 धावा ठोकल्या. विराटचे द्वीशतक आणि जयंत यादवचे पहिलेवहिले शतक हे कसोटीच्या चौथ्या दिवसाचे महत्त्व ठरले, तर पाचव्या दिवशी अश्विनने कमाल केली. दरम्यान, डावानं पराभव टाळण्यासाठी इंग्लंडला 231 धावांची आवश्यकता होती. पण इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 195 धावांतच आटोपला. अश्विन दुसऱ्या डावात इंग्लंडचे 6 गडी बाद केले. दरम्यान, अश्विननं एका डावात 5 बळी घेण्याचा कपिल देवचा विक्रमही मोडीत काढला आहे. कपिल देवनं 23 वेळा एका डावात 5 बळी घेतले होते. तर अश्विननं आता 24 वेळा अशी कामगिरी केली आहे.

पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर इंग्लंडचे उर्वरित चार फलंदाज अवघ्या 13 धावात तंबुत परतले आणि इंग्लंडचा डाव 195 धावांवर संपुष्टात आला. चौथ्या कसोटीत एकूण मिळून 12 बळी घेणा-या रविचंद्रन अश्विनने पाचव्या दिवशीही आपली जादू कायम राखत इंग्लंडला रोखून धरले.