पुण्य़ाच्या बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या लॉकरमधून १० कोटी जप्त

पुणे: देशातील विविध शहरांमध्ये बेहिशेबी पैशांचं घबाड हाती लागत असून आता पुणे येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या पर्वती शाखेतील लॉकरमध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीची कोट्यवधींची रक्कम प्राप्तिकर विभागाने जप्त केली आहे. मंगळवारपासून प्राप्तिकर विभागाचे अधिकारी या बॅंकेच्या या शाखेत चौकशी करत होते. सद्या कंपनीचे काहीच लॉकर उघडण्यात आले असून ही रक्कम १० कोटींची असल्याचे समजते. कंपनीचे सर्व लॉकर पुढील काही दिवसात उघडण्यात येणार आहेत.

आयकर विभागाने तपास केला असता त्या लोकर्समधे दोन हजार रूपयांच्या स्वरूपात 10 कोटी रुपये मिळाले. यामध्ये 10 कोटी रुपयांपेक्षा वरील रक्कम ही 100 रुपयांच्या नोटांमध्ये आहे. प्राप्तिकर विभागाच्या या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत प्राप्तिकर विभागाने राज्यात टाकलेल्या धाडीनंतर ही जप्त करण्यात आलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे. मंगळवारपासून ही कारवाई सुरू असून पुढचे काही दिवस ही कारवाई सुरूच राहणार आहे.