नोटाबंदीनंतर बँकेच्या रांगेत सांगलीतील माजी नगरसेवकाचा मृत्यू

नोटाबंदी

सांगली – काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा मोठा निर्णय घेतला. या निर्णयानंतर देशभरातील सामान्य नागरिकांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांचजण गोंधळून गेले. नोटाबंदीनंतर सामान्य नागरिकांना नव्या नोटा मिळविण्यासाठी बँक आणि एटीएमबाहेर रांगा लावत असल्याचं पहायला मिळालं. मात्र, बँकेबाहेर लावलेल्या रांगेत मृत्यू होऊन अनेक सामान्य नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पण आता बँकेबाहेर रांगेत उभे असताना एका राजकारण्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

सांगली जिल्ह्यातील विटा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक शेकू पांडुरंग कांबळे यांना बँकेबाहेर रांगेत उभे असताना ह्रदयविकाराचा झटका आला. ह्रदयविकाराच्या झटक्याने शेकू पांडुरंग कांबळे यांचे निधन झाले आहे. या घटनेने बँकेच्या रांगेत असताना मृत्यू होणा-यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे