महाराष्ट्र देशा डेस्क : बॉलीवूडचे प्रसिद्ध कपल म्हणजेच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा बहुचर्चित सिनेमा ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमातलं बहुप्रतीक्षित आणि पहिलंच गाणं ‘केसरीया’ हे नुकतच लॉन्च झालं आहे. या गाण्याचा टिझर लॉन्च झाल्यापासून चाहते पूर्ण गाणं लॉन्च होण्याची वाट पाहत होते. हे गाणं लॉन्च झालं आणि चाहत्यांनी त्याला डोक्यावर घेतलं. इंटरनेट पाहावं तिकडे फक्त ‘केसरीया’चा फिवर पाहायला मिळत आहे. याच गाण्याचं मराठी व्हर्जन पुण्यातील एका तरुणाने बनवलं आहे. श्रेयस देशपांडे असं या अवलियाचं नाव असून त्याचं हे गाणं देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
श्रेयस देशपांडे याने या गाण्याचे शब्द मराठीमध्ये लिहले आणि स्वतःच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड केलं. हे गाणं त्याने आजच त्याच्या यूट्यूब अकाउंटवर पोस्ट केलं आहे आणि या गाण्याला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. श्रेयसने या आधीही अनेक गाण्यांचे कव्हर सॉंग्स त्याच्या अकाउंटवर पोस्ट केले आहेत. जे लोकांना खूप आवडले होते. यामुळेच श्रेयसचे यूट्यूबवर ४ हजारांहून जास्त सब्स्क्रायबर्स आहेत.
‘केसरीया’ हे मूळ गाणं हे सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंग याने गायलेले असून प्रीतम याने ते कम्पोज केले आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘पुष्पा’ सिनेमातील श्रीवल्ली गाण्याचं मराठी व्हर्जन खूपच प्रसिद्ध झालं होतं. तसेच ‘केसरीया’चं हे मराठी व्हर्जनही प्रसिद्ध होईल यात शंका नाही.
महत्वाच्या बातम्या:
- Ramdas Kadam : पक्ष संपला तरी चालेल, पण उद्धव ठाकरे पवारांसोबतच आहेत, हे का होतंय?; रामदास कदमांचा सवाल
- Sanjay Raut : लढाई कोणतीही असू द्या, आम्ही दोन हात करायला तयार – संजय राऊत
- offers on cars | कार खरेदी करायचा विचार करताय?; पहा ‘या’ कारवर मिळतायेत जबरदस्त ऑफर्स
- Ramdas Kadam : शरद पवार आणि अजित पवार दोघांनी शिवसेना फोडली; रामदास कदम यांचा गंभीर आरोप
- Ashish Jaiswal | महाविकास आघाडीची खूप मोठी किंमत शिवसेनेला मोजावी लागली – आशिष जयस्वाल
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<