fbpx

सलग तिस-यांदा पटकावला ‘महाराष्ट्र केसरी’ किताब

विजय चौधरी

पुणे – जळगावचा कुस्तीपटू विजय चौधरी याने सलग तिस-यांदा महाराष्ट्र केसरी किताब आपल्या नावावर केला आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत कुस्तीपटू विजय चौधरी याने पुण्याच्या अभिजित कटके याच्यावर मात करत महाराष्ट्र केसरीची गदा उचलली. अभिजित कटके याने यंदा प्रथमच महाराष्ट्र केसरी गटात अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

विजय चौधरीनं माती विभागातून महाराष्ट्र केसरीची फायनल गाठली होती. तर अभिजित कटकेनं मॅट विभागातून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यामुळे महाराष्ट्र केसरीच्या फायनल मॅचमध्ये विजय चौधरीचे पारडे जड असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. या मॅचमध्ये विजयची पकड पहिल्यापासून दिसत होती आणि अखेर विजय चौधरी याने २-० अशा फरकाने अभिजित कटकेवर विजय मिळवला.

1 Comment

Click here to post a comment