वानखेडेवर ‘विराट खेळी’, कारकिर्दीतले 3 द्विशतक

भारतीय कसोटी संघाटा कर्णधार विराट कोहलीने आपल्या नेहमीच्या खेळाला साजेशीच खेळी करत आपल्या कारकिर्दीतील तिसरे द्वीशतक ठोकले. इंग्लंड विरूद्ध सुरू असलेल्या या मालिकेत चौथ्या दिवशीही आपला फॉर्म कायम ठेवत विराट कोहलीने नेत्रदीपक कामगिरी केली

विशेष म्हणजे विराटने आपल्या किक्रेट कारकिर्दीत ठोकलेली ही तिनही शतकं एकाच वर्षात ठोकली आहेत. त्याने पहिले द्विशतक वेस्ट इंडिजविरूद्ध जुलै महिन्यात झालेल्या सामन्यात ठोकले होते. तर, न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या मालिकेत त्याने दुसरे द्विशतक झळकावले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा विराटची बॅट तळपली आणि त्याने तिसरे द्विशतक ठोकत वानखेडे स्टेडियमवर विक्रमी खेळी केली. आतापर्यंतच्या खेळीमधील विराटची ही सर्वोत्तम खेळी असल्याचे सांगितले जात आहे.