मुंबई मधील मराठी टक्का वाढवला पाहिजे ; राज ठाकरे

राज ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे सध्या सांगली शहराच्या दौऱ्यावर आहे. दरम्यान आयोजित सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत राज ठाकरे बोलत होते.

मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे प्रयत्न चालू असून मुंबई मधील मराठी टक्का वाढवला पाहिजे. मराठी माणूस मुंबईत टिकावा म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी संस्था, शैक्षणिक व अन्य व्यापारी संकुलांचा मेळावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे संस्था मुंबई मध्ये निर्माण होतील आणि मराठी युवकांना रोजगार मिळेल.