Proud to be an Indian: या भारतीयाने लावला होता ई-मेलचा शोध

दीपक पाठक :  आज संपूर्ण जगभरात इंटरनेटच मायाजाल पसरत आहे. नवनवीन शोध लावले जात आहेत,रोज ढीगभर नवीन अॅप्स मार्केट मध्ये दाखल होत आहेत. जे लोकप्रिय अॅप्स आहेत त्यांचे जनक बहुतांशी विदेशी आहेत. परंतु खूप कमी लोकांना माहिती असेल की ई-मेल या जलद गतीने महत्वाचे संदेश पोहचवण्याच्या प्रणालीचा शोध एका भारतीयाने लावला आहे….आश्र्चर्य वाटलं?

वी ए शिवा अय्यादुरई अस इ-मेलच्या निर्मात्याच नाव . 2 दिसंबर, 1963 रोजी त्यांचा जन्म मुंबईमध्ये झाला . आई मीनाक्षी अय्यादुरई, वडील वी. अय्यादुरई, आणि बहीण डॉ. उमा वी. अय्यादुरई असा शिवाचा छोटासा परिवार. छोटा शिवा सात वर्षाचा असताना आई बाबांसोबत अमेरिकेला गेला. न्यू जर्सीच्या यूनिवर्सिटी ऑफ मेडिसीन आणि डेन्टीस्ट्रीमध्ये असताना शिवा अय्यादुराई यांच्या चिकाटी आणि कॉम्युटर शास्त्र शिकण्याच्या वेडाने प्रभावित होऊन कॉम्प्युटर लॅबोरेटरी नेटवर्कचे संचालक डॉ. लेस्ली मिशेलसन यांनी तत्कालीन कागदी पत्रव्यवहाराला पर्यायी असा कॉम्प्युटर प्रोग्राम बनवायला सांगण्यात आलं.

ध्येय गाठण्याच्या जिद्दीने आंतर कार्यालयीन पत्रव्यवहाराचा त्यांनी दिवस-रात्र एक करून अत्यंत बारकाईने अभ्यास केला. त्यातील आवक-जावक यंत्रणेचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर इनबॉक्स, आऊटबॉक्स, ड्राफ्ट, कार्बन कॉपी, फोल्डर, अॅड्रेस बुक, अटॅचमेंटसाठी वापरायच्या पेपरक्लिप्स याचा इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीममध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी तब्बल 50 हजार लाईन्सचा प्रोग्राम कोड तयार केला. हा प्रोग्राम कोड म्हणजेच आज आपण वापरत असलेला ईमेल आहे.

 

वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी ईमेल या प्रोग्रामची निर्मिती केली. त्यावेळी त्यांने आपल्या शोधाचा कॉपीराईटही घेतला होता. 1978 मध्ये जरी ईमेलचा प्रोग्राम तयार केला असला तरी ईमेलचा प्रवर्तक किंवा जन्मदात म्हणून त्याला त्याचं श्रेय मिळण्यासाठी आणखी चार वर्षांचा अवधी जावा लागला. 30 ऑगस्ट 1982 रोजी अमेरिकी प्रशासनाने शिवा अय्यादुराई यानेच ईमेलचा शोध लावल्याचं जाहीर केलं.

आज ‘ई-मेल हे सर्वात जलदगतीने संवाद साधण्याचे माध्यम बनले आहे. ‘ई-मेल रिवोल्यूशन’ या त्यांच्या पुस्तकात त्यांनी ‘ई-मेलच्या निर्मितीचा रंजक प्रवास वर्णन केला आहे.

महत्वाच्या बातम्या