‘एडल्ट्स ओन्ली’ या मराठी सिनेमाचं पोस्टर रिलीज

मुंबई: मराठीत सध्या वेगवेगळ्या कथांवरून प्रयोग केले जात असतानाच आता आणखी एक वेगळा सिनेमा मराठीत येतो आहे. मराठीत पहिल्यांदाच सेक्स कॉमेडी जॉनरचा सिनेमा येणार आहे. हा सिनेमा केवळ प्रौढांसाठीच असणार आहे. हिंदीमध्ये असे अनेक सिनेमे येत असतात मात्र मराठीत पहिल्यांदाच असा सिनेमा येत असल्याने प्रेक्षकांमध्येही या सिनेमाबद्दल उत्सुकता वाढली आहे. नुकतच या सिनेमाचं पोस्टर टिझर रिलीज करण्यात आलं आहे.

दिग्दर्शक मिलिंद अरूण कवडे यांनी सेक्स कॉमेडी असलेल्या ‘एडल्ट्स ओन्ली’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर अमित धुपे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. मराठी सध्या वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे तयार होत आहेत. अशात या सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मिलिंद कवडे यांनी ‘येड्यांची जत्रा’, ‘४ इडियट्स’, ‘जस्ट गंमत’, ‘शिनमा’ सारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. आता ते यावेळी एक वेगळाच प्रौढांचा सिनेमा घेऊन आले आहेत. यातून धमाकेदार कॉमेडी दाखवली जाणार असून या सिनेमाला मराठी तरूणाई कशाप्रकारे प्रतिसाद देतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे

You might also like
Comments
Loading...